सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST2021-04-24T04:32:47+5:302021-04-24T04:32:47+5:30

कळंब - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे शेतात वास्तव्यास गेली आहेत. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी महावितरणने एक फेज ...

Continue single phase power supply | सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवा

सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवा

कळंब - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे शेतात वास्तव्यास गेली आहेत. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी महावितरणने एक फेज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कळंब तालुका भाजपने केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. याची धास्ती घेत अनेक गावांतील कुटुंबे शेतात राहण्यासाठी गेली आहेत. अशा स्थितीत महावितरणच्या लोडशेडिंग धोरणामुळे त्या कुटुंबास रात्रीचा वीजपुरवठा मिळत नसल्याने गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे महावितरण कंपनीने तालुक्यातील सर्व ग्रामीण भागात रात्रीसाठी एक फेज लाइटपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी कळंब तालुका भाजपने केली आहे. याविषयी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, शहराध्यक्ष संदीप बावीकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, पंसचे माजी सभापती दत्तात्रेय साळुंखे, तालुका चिटणीस माणिक, मेघराज देशमुख, बाळासाहेब पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Continue single phase power supply