बांधकाम विभागाने झाडाची फांदी तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST2020-12-30T04:41:55+5:302020-12-30T04:41:55+5:30

धोका टळला : वाहनधारकांना दिलासा लोहारा : लोहारा ते पाटोदा रस्त्यावर लोंबकळणाऱ्या झाडाच्या फांदीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ...

The construction department broke the tree branch | बांधकाम विभागाने झाडाची फांदी तोडली

बांधकाम विभागाने झाडाची फांदी तोडली

धोका टळला : वाहनधारकांना दिलासा

लोहारा : लोहारा ते पाटोदा रस्त्यावर लोंबकळणाऱ्या झाडाच्या फांदीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध करताच याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ही फांदी तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. लोहारा ते पाटोदा रस्त्यावर लोहारा शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर ओढ्याच्या पुढे रस्त्याच्या कडेच्या बाबळीच्या झाडाच्या वरच्या फांदीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा धक्का लागल्याने ती फांदी अर्धवट तुटून रस्त्यावर लोंबकळत होती. यामुळे अर्धा रस्ता व्यापला गेला होता. दिवसा येणारे वाहन बाजूने जाऊ शकत होते; परंतु रात्रीच्या वेळी वाहनांना जवळ आल्यानंतरच झाडाची फांदी दिसत असल्याने, तसेच दुचाकी चालकांना समोरून एखादे वाहन आल्यास त्याच्या प्रकाशात ही फांदीच दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला होता. दरम्यान, रविवारी रात्री आठदरम्यान एक दुचाकीस्वार वाहनासह या फांदीला धडकला. सुदैवाने त्याला कुठलीही दुखापत झाली नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध करताच याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुपारी ही फांदी तोडून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

Web Title: The construction department broke the tree branch