शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत काँग्रेसचे ‘निषेधासन’ आंदोलन; राज्य सरकारच्या चार वर्षाचा केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 19:03 IST

या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़

उस्मानाबाद : भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात भाजपाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखविल्याचा आरोप करीत जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधासन आंदोलन करण्यात आले़ भाजपा सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्त युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडात गाजर धरून विविध ‘निषेधासने’ केली़

फडणवीस सरकार नसून फसवणीस सरकार असल्याची टीका यावेळी करण्यात आली़ केंद्रासह राज्य शासनाने मागील चार वर्षात जनतेची फसवणूक करत जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांना लूटल्याचा आरोपही करण्यात आला़ युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेगवेगळी आसने करीत शासनाच्या कारभाराचा निषेध नोंदविला़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़

यावेळी युवकचे प्रदेश निरीक्षक नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रविण देशमुख, सेवा दलाचे शाळू, अ‍ॅड़ दर्शन कोळगे, बालाजी बिदे, बलभीम जाधव, आयुब पठाण, अमर माने, बालाजी नेटके, विकी सोनटक्के, भैय्या निरफळ, राम कदम, बापू खटके, अ‍ॅड़ रणखांब, सुभाष हिंगमिरे, सदानंद जगदाळे, श्रीनाथ पडवळ, बाबा कसबे, आश्रुबा माळी, संजय घोगरे, आनंद घोगरे, सत्यजीत पंडित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद