अणदुरात काँग्रेसचा झेंडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:04+5:302021-02-11T04:34:04+5:30
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे काँग्रेसप्रणीत पॅनलने भाजपाप्रणीत पॅनलचा धुव्वा उडवून ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा कायम ठेवला आहे. सर्वसाधारण ...

अणदुरात काँग्रेसचा झेंडा कायम
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे काँग्रेसप्रणीत पॅनलने भाजपाप्रणीत पॅनलचा धुव्वा उडवून ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा कायम ठेवला आहे. सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी असलेल्या सरपंचपदावर रामचंद्र आलुरे तर उपसरपंचपदी डॉ. नागनाथ कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमवारी सरपंच, उपसरपंच निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक अधिकारी कोंडीबा भांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामविकास अधिकारी देवीदास चव्हाण, तलाठी विलास कोल्हे यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी सरपंचपदी रामचंद्र आलुरे तर उपसरपंचपदी डॉ. नागनाथ कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नूतन सदस्य बाळकृष्ण घोडके-पाटील, धनराज मुळे, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. नागनाथ कुंभार, सरिता मोकाशे, डॉ. विवेक बिराजदार, अनुसया कांबळे, बालाजी घुगे, गणेश सूर्यवंशी, मोतनबी इनामदार, गोदावरी गुड्ड, स्नेहा मुळे, देवकी चौधरी, जयश्री व्हटकर, उज्ज्वला बंदपट्टे यांच्यासह माजी सभापती बालाजी मोकाशे, माजी उपसरपंच आप्पाराव मुळे, करबसप्पा धमुरे, आप्पासाहेब शेटे, पृथ्वीराज मुळे, मनोज मुळे, प्रबोध कांबळे, बाबूराव मुळे, नागनाथ शेटे, महताब इनामदार, विशाल शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती
या निवडीनंतर गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. रात्री जि. प. सदस्य बाबूराव चव्हाण, आप्पाराव मुळे, बाळकृष्ण घोडके, धनराज मुळे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच रामचंद्र आलुरे व उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार यांचा सत्कार करून विजयाची सभा घेऊन ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.