पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:26+5:302021-06-20T04:22:26+5:30

२०१४ मध्ये भाजपाने जनतेला चांगले दिवस येतील, असे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली. मागील सात वर्षांपासून देशात दिवसेंदिवस महागाई ...

Congress agitation against petrol-diesel price hike | पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

२०१४ मध्ये भाजपाने जनतेला चांगले दिवस येतील, असे आश्वासन देऊन सत्ता काबीज केली. मागील सात वर्षांपासून देशात दिवसेंदिवस महागाई उच्चांक गाठत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच केंद्र सरकाने शेतकरी व कामगार विरोधी कायदे लागू करून शेतकरी व कामगारांवरही अन्याय केला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमतीही वाढू लागल्या असल्याचा याचा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, सरचिटणीस जावेद काझी, माजी नगरसेवक सय्यद खलील सर, युवक प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, शहाजी मुंडे, किसान सेलचे निरीक्षक विश्वजित शिंदे, जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, राज कुलकर्णी, प्रणित डिकले, आयुब पठाण, सुरेंद्र पाटील, शहर कार्याध्यक्ष अलीम शेख, सलमान शेख, संजय गजधने, रेहमुन्नीसा शेख, कफिल सय्यद, राहुल लोखंडे, इम्रान हुसैनी, महेश पाटील, नियामत मोमीन, अभिजित देडे, जमील सय्यद, आरिफ मुल्ला, कृष्णा तवले, प्रसन्न कथले, समाधान घाटशिळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फलकांनी वेधले लक्ष...

जो किसानोसे टकराया मिट्टी मे मिल जायेगा,

काळा कायदा मोंदीचा शेतकऱ्यांच्या बर्बादीचा,माझी मशाल, माझा दणका पेटवू मोदींच्या पापाची लंका,

शेतकरी विरोधी जुल्मी कायदा, फक्त अदानी अंबानी यांनाच फायदा अशा अशा आशयाच्या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Congress agitation against petrol-diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.