शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘राफेल’वरून काँग्रेस आक्रमक; उस्मानाबादेत जिल्हा कचेरीसमोर केली निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:17 IST

काँग्रेसच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली. 

ठळक मुद्देघोषणांनी दणाणल परिसर

उस्मानाबाद : ‘गली गली में शोर है, चौकीदार चोर है’, ‘राफेल घोटाळ्याची चौकशी होत कशी नाही, झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही साथ मिळाली. 

केंद्र सरकारने राफेल या लढावू विमान खेरेदीत प्रचंड आर्थिक, नैतिक भ्रष्ट्राचार केला आहे़ एवढ्यावरच न थांबता सरकारने  सर्वोच्च न्यायालयातही खोटी माहिती देऊन न्याय संस्थेची पर्यायाने देशवासियांची दिशाभूल केली. त्यामुळे राफेल खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सरकार विरोधाक प्रचंड घोषणाबाजी केली. जोपर्यंत सरकार व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करीत नाही, तोवर शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.  आंदोलनात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  अग्निवेश शिंदे, युवकचे माजी प्रदेश सचिव अ‍ॅड़ जावेद काझी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, विनोद वीर,  पांडुरंग कुंभार,  अभिजीत देडे, सलीम शेख, ऋषीकेश हंचाटे, दर्शन कोळगे, शमियोद्दीन मशायक, भाऊसाहेब उंबरे, अंगुल बनसोडे, पंचायत समिती सदस्य अश्रुबा माळी, बाळासाहेब मुंडे, विधी विभागाचे अ‍ॅड़ विश्वजित शिंदे, अ‍ॅड़ राहुल लोखंडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीचाही सक्रीय सहभागकाँग्रेसच्या या आंदोलनाला पाठींबा देत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनीही सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी युवराज नळे, दत्ता बंडगर, माणिक बनसोडे, बाबा मुजावर, ईस्मार्लल शेख, सनी पवार, अ‍ॅड़ मंजूषा मगर,अस्मिता कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झालेला नसेल तर सरकार संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यास का घाबरतेय? असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डीलOsmanabadउस्मानाबाद