सुरक्षा दलातील निवडीबद्दल सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST2021-04-20T04:33:50+5:302021-04-20T04:33:50+5:30
‘कोरोनामुक्त गाव’ अभियानास प्रारंभ कळंब : तालुक्यातील मलकापूर-संजीतपूर येथे ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ या अभियानास शनिवारी प्रारंभ झाला. या ...

सुरक्षा दलातील निवडीबद्दल सत्कार
‘कोरोनामुक्त गाव’ अभियानास प्रारंभ
कळंब : तालुक्यातील मलकापूर-संजीतपूर येथे ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ या अभियानास शनिवारी प्रारंभ झाला. या अंतर्गत ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तपासणी करण्यात आली. तसेच ४५ वर्षांपुढील नागरिकांना तत्काळ लसीकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच रुक्मिणी घोळवे, उपसरपंच सुधीर पायाळे, शिक्षक समाधान बाराते, अंगणवाडी कार्यकर्ती मिनाबाई कुटे, ग्रामसेवक दीपक वेदपाठक आदी उपस्थित होते.
मास्क वाटप
वाशी : तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव अशिष पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश चौघुले, कृष्णा जगताप आदींनी हे साहित्य पोनि अजीनाथ काशिद यांच्याकडे सुपूर्द केले.
व्यापाऱ्यांना फटका
तुळजापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शहरात सध्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे येथील वर्गाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
मोकाट कुत्रे वाढली
उस्मानाबाद : शहरातील समतानगर भागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही कुत्रे वाहनधारक तसेच पादचाऱ्यांचे अंगावर धावून जात असून, पालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.