मंदिराच्या पत्रा शेडची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:36+5:302020-12-29T04:30:36+5:30
(फोटो : प्रशांत बनसोडे २८) उस्मानाबाद : शहरातील क्रांती चाैकामध्ये असलेल्या मारूती मंदिरावरील पत्र्याचे शेड मोडकळीस आले आहे. त्यामुळे ...

मंदिराच्या पत्रा शेडची दुरवस्था
(फोटो : प्रशांत बनसोडे २८)
उस्मानाबाद : शहरातील क्रांती चाैकामध्ये असलेल्या मारूती मंदिरावरील पत्र्याचे शेड मोडकळीस आले आहे. त्यामुळे त्याची त्वरित दुरूस्ती करावी किंवा नवीन पत्र्याचे शेड उभारावे, अशी मागणी बहुजन एकता विकास परिषदेने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाजुस असलेल्या क्रांती चाैकातील मारूती मंदिरावरील लोखंडी पत्रे तसेच ॲंगल पूर्णपणे खाली वाकले आहेत. त्यामुळे ते कधीही पडण्याची शक्यता आहे. या भागातील अनेक लहान मुले, वयोवृद्ध नागरिक मंदिराच्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसलेले असतात. पत्रे किंवा ॲंगल खाली पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरावरील पत्रे व ॲंगलची दुरूस्ती करावी, मंदिर परिसरात स्वच्छता करावी, अन्यथा आगामी काळात बहुजन एकता परिषद व भिमनगर भागातील नागरिक नगर परिषदेसमोर आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर भिम निर्णायक युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष गाैतम बनसोडे, बहुजन एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बनसोडे, उमेश शिरसाठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.