बलसूर येथील काेल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST2021-04-30T04:42:00+5:302021-04-30T04:42:00+5:30

लाेंबकळणाऱ्या विद्युत तारांचा धाेका वाढला तेर - उस्मानाबाद तालुक्यातील तेर शिवारात लाेंबकळणाऱ्या विद्युत तारांचा धाेका वाढला आहे. शेतातून कडबा ...

Condition of Kalhapuri Dam at Balsur | बलसूर येथील काेल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

बलसूर येथील काेल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था

लाेंबकळणाऱ्या विद्युत तारांचा धाेका वाढला

तेर - उस्मानाबाद तालुक्यातील तेर शिवारात लाेंबकळणाऱ्या विद्युत तारांचा धाेका वाढला आहे. शेतातून कडबा वा अन्य साहित्य घेऊन जाताना या तारा वाहनांना चिकटतील, अशा स्थितीत आहेत. महावितरण कंपनीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वेळाेवेळी करण्यात आली. परंतु, आजवर लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे लाेंबकळणाऱ्या तारांचा प्रश्न कायम आहे.

किलज येथे काेराेना जनजागृती

तुळजापूर - तालुक्यातील किलज येथे माझे गाव काेराेनामुक्त गाव या माेहिमेअंतर्गत गावातील शिक्षकांनी प्रत्येक वाॅर्डात फिरून जनजागृती केली. ग्रामस्थांनी न घाबरता काेराेना लस घ्यावी व काेराेनाच्या वाढत्या संसर्गापासून कुटुुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या माेहिमेत मुख्याध्यापक बसवराज साेळसे, संभाजी मसेकर, एस. बी. माळी, ताकमाेगे, जिरगे, नकाते, शिंदे यांच्यासह अन्य शिक्षक सहभागी झाले हाेते.

Web Title: Condition of Kalhapuri Dam at Balsur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.