सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:56+5:302021-03-06T04:30:56+5:30

युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन उस्मानाबाद - प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेच्या माध्यमातून पळसवाडी हद्दीत करण्यात येत असलेल्या रस्त्याबाबत युवक काँग्रेसकडून तक्रार ...

Complaint about cement road work | सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत तक्रार

सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत तक्रार

युवक काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

उस्मानाबाद - प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेच्या माध्यमातून पळसवाडी हद्दीत करण्यात येत असलेल्या रस्त्याबाबत युवक काँग्रेसकडून तक्रार करण्यात आली आहे. हे काम नियमबाह्य हाेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर युवकचे उपाध्यक्ष राेहित पडवळ, उमेश राजेनिंबाळकर, सिद्धार्थ बनसाेडे, कदम आदींची नावे आहेत.

‘उपकेंद्र सहाय्यक म्हणून नियुक्ती द्या’

उस्मानाबाद - विद्युत महावितरण अंतर्गत निवड झालेल्या ‘इडब्ल्यूएस’ प्रवर्गातील पात्र उमेदवारांना उपकेंद्र सहाय्य या पदावर तातडीने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. निवेदनावर माेगल काैसर, गणेश उंबरे, शेख असलम, वैभव कानडे, शेख अमीर आदींची नावे आहेत.

उस्मानाबादेत आज वेल्डिंग कार्यशाळा

उस्मानाबाद - फॅबकी फॅब्रिकेशन क्लस्टरच्या वतीने ‘सीओटू’ वेल्डिंग या विषयावर शनिवारी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा आरटीओ कार्यालयाशेजारी असलेल्या क्लस्टरच्या कार्यालयात हाेणार आहे. उद्घाटन जिल्हा उद्याेग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हनबर, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक शिरीष गायकवाड यांच्या हस्ते हाेणार आहे. यावेळी विनाेद गाेडबाेेले, नृपल देशपांडे, अभय तापडिया आदी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती चेअरमन प्रवीण काळे यांनी दिली.

‘नवीन दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करा’

उस्मानाबाद -नवीन दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी यासह आदी मागण्यांचे निवेदन अपंग जनता दलच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला जाईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष शेख अनिस यांनी दिला आहे.

Web Title: Complaint about cement road work