तामलवाडी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) महामार्ग ते पांगरदरवाडी या सहा कि.मी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. रस्ता कामासाठी २ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून सांगवी ते पांगरदरवाडी या सहा कि.मी. रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता. पांगरदरवाडी येथे तरुणांनी खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून आंदोलन केले होते. अखेर या रस्त्याचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत होऊन त्यासाठी २ कोटी ९४ लाख ३० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. याच सांगवी ते पांगरदरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ गुरुवारी आ. पाटील याच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विकमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, सभापती रेणुका इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदे, सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलिंद मगर, पांगरदरवाडीचे विजय निंबाळकर, बालाजी डोंगरे, शंकर कदम, मधुकर मगर, राम गुंड, विश्वास मगर, भीमा भुईरकर, रवी मगर, मारुती मते, विष्णू मगर, ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता नेताजी दंडनाईक आदी गावकरी उपस्थित होते.
चौकट
वैयक्तिकरित्या विम्याची तक्रार करू नये
महिनाभरापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. सोयाबीन, मूग, उडीद ही पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्या नुकसानीचे पीक सर्वेक्षण कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी गावागावात जाऊन करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी वैयक्तीकरित्या विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार करण्याची गरज नाही, अशी माहिती आ. पाटील यांनी यावेळी दिली.
चौकट
पुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
, .,,,,,,,,,,,,,,,,, ..,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सागंवी ( काटी ) गावाला जोडणाऱ्या पुलाचा नव्याने बांधकामाचा प्रस्ताव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाकडून मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविला आहे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.