काक्रंबा गटातील विकास कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:44+5:302021-06-24T04:22:44+5:30
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गटात आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बुधवारी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. हंगरगा ...

काक्रंबा गटातील विकास कामांना प्रारंभ
काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गटात आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते बुधवारी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
हंगरगा (तुळ) येथे सिमेंट रस्ता, हायमास्ट लॅम्प, गटारी तसेच सलगरा येथे सिमेंट रोड, सिमेंट गटारी सह त्यांच्या निधीतून दिलेल्या बारुळ व सलगरा येथील सभागृहाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, पं. स सदस्य शिवाजी गोरे, नगरसेवक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी प्रमुख्याने पीक विमा, शेत रस्ते, बोरी नदीवरील पूल, नवीन बंधारे त्याचबरोबर विद्युत जोडणी अशा अनेक समस्यांवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु ७२ तासांमध्ये विमा कंपनीकडे तक्रार केली नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहायकांकडे करावेत, असे आवाहन आ. पाटील यांनी यावेळी केले. यावेळी बारूळच्या सरपंच सिंधुताई सुपनार, उपसरपंच हमीदा शेख, शिवाजी इंगोले, शरद जमदाडे, अनिल बंडगर, बाबा श्रीनामे, पद्मराज गडदे, सोसायटीचे चेअरमन बाबूराव ठोंबरे, सुभाष पाटील, शहाजी सुपनार, संजय ठोंबरे, राजकुमार वट्टे, सुनील नवगिरे, सुमन ठोंबरेे, दीपाली यावलकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर सुपनार यांनी केले तर आभार नबीलाल शेख यांनी मानले.