शिवजन्मोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:32 IST2021-03-05T04:32:11+5:302021-03-05T04:32:11+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य हाफ पिच क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार ...

Commencement of cricket tournament on the occasion of Shivjanmotsavani | शिवजन्मोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

शिवजन्मोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य हाफ पिच क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमोद चुंगे, संग्रामसिंह जाधव, विनोद चव्हाण, विजयकुमार जाधव, सोमनाथ मोरे, संग्राम राजेपांढरे, बालाजी चुंगे, बालाजी खराबे, वैभव तांबे, धनाजी पाटील, विशाल जाधव, मंगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत ४० संघांनी सहभाग नोंदवला असून, सुरुवातीचा सामना धोत्रीविरुद्ध सुरतगाव यांच्यात पार पडला. प्रथम फलंदाजी करताना सुरतगाव संघाने ८ षटकात ८० धावा काढल्या. प्रतिउत्तरात खेळताना धोत्री येथील संघाने ८१ धावा काढून ३ चेंडू शिल्लक राखत विजय मिळविला. स्पर्धेचे आयोजन संग्रामसिंह जाधव, ग्रामपंचायत पिंपळा (बु) व ग्रामस्थांनी केले आहे.

Web Title: Commencement of cricket tournament on the occasion of Shivjanmotsavani