बंद शटरआड व्यवहार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:30+5:302021-05-07T04:34:30+5:30

उमरगा: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावलेले आहेत. असे असतानाही अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या ...

Closed shutter transaction continues | बंद शटरआड व्यवहार सुरूच

बंद शटरआड व्यवहार सुरूच

उमरगा: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावलेले आहेत. असे असतानाही अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत कापड दुकानासह इतर दुकानात बंद शटरआड सुरू असलेल्या व्यवहाराचा बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांनी पर्दाफाश करून दंडात्मक कारवाई केली.

उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थितीत प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या काळात दुकानदारांची मक्तेदारी व नागरिकांच्या बेफिकीरीकडे पोलीस, पालिकेचे दुर्लक्ष होत होते. प्रशासनाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू केली. परंतु, बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नव्हते. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू असताना बाजारपेठेतील कापड व्यापारी, सराफ व्यापारी, जनरल स्टोअर्स दुकाने छुप्या पद्धतीने सुरू ठेवण्यात येत होती. बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव, साहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक तुळशीदास वऱ्हाडे, अभियंता डी. पी. राऊत, करबस शिरगुरे, शेषराव भोसले, किरण क्षीरसागर, सलीम सास्तुरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने बाजारपेठेत धडक कारवाई केली. त्यात शामकुमार द्वारकादास कापड दुकान, स्वागत कलेक्शन, लाईफ स्टाईल, गुडलक जनरल स्टोअर्स, सिद्धी इलेक्ट्रीकल्स यासह दहा दुकाने पालिकेने सील केली असून प्रत्येकी दहा हजार दंड केले. दुपारपर्यंत ४ दुकानदारांकडून प्रत्येकी १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Closed shutter transaction continues