वातावरणात बदल; आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:36+5:302021-02-06T04:59:36+5:30
रस्ताकामाबाबत आंदोलनाचा इशारा उस्मानाबाद : उस्मानाबाद ते उजनी रस्ता विस्तारीकरणाच्या कामास उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना ठेकेदाराकडून काम सुरू ...

वातावरणात बदल; आजार वाढले
रस्ताकामाबाबत आंदोलनाचा इशारा
उस्मानाबाद : उस्मानाबाद ते उजनी रस्ता विस्तारीकरणाच्या कामास उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना ठेकेदाराकडून काम सुरू आहे. ते तत्काळ थांबविण्यात यावे, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा रुईभर येथील शेतकरी किशोर कोळगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
श्रीपतराव भोसले हायस्कूलचे यश
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेमार्फत राज्य समन्वयक डॉ. चारू मलिक यांच्या उपस्थितीत शाळांची यशोगाथा व गुणवत्ता दर्शविणारे चित्रीकरण असे उपक्रम राबविण्यात आले होते. यात येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचा समावेश आहे. सदर उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबादच्या कार्यबल गट सदस्यांमार्फत प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले. या शाळेतील अध्यापनाचे व्हिडीओ राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड होणार आहेत.
विठ्ठल मंदिरात गीतरामायण
उस्मानाबाद : श्रीराम मंदिर निर्माण अयोध्या निधी संकलन अभियानात ‘संस्कार भारती’च्या वतीने शहरातील गणेश वस्तीतील श्री विठ्ठल मंदिरात ‘गीतरामायण’ कार्यक्रम झाला. यावेळी सादरकर्ते प्रसन्नकुमार कोंडो यांना संवाददिनीवर अशोक कुलकर्णी, तबल्यावर अण्णा वडगावकर, टाळवादनासाठी ज्योती शिंदे, सुधीर पवार, तसेच शेषनाथ वाघ, शरद वडगावकर यांनी साथसंगत केली. यावेळी संस्कार भारतीचे पदाधिकारी अक्षय शाम भन्साळी, उपनगराध्यक्ष आबा इंगळे, संभाजी सलगर, रवी वाघमारे, शशिकला जोशी, प्रमिला पाटील, राहुल जोशी, ओमकार पाठक, प्रशांत स्वामी, आयुर्वेदाचार्य श्रीकांत राजमाने, अमोल नरवडे, धनंजय, केदार देशमुख, आदी उपस्थित होते.
रस्त्याचे काम संथगतीने सुरू
तेर : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेगाव ते पंढरपूर या रस्त्याचे काम पवारवाडी पाटी ते तेरणा मध्यम प्रकल्पापर्यंत अर्धवट अवस्थेत आहे. हे लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
‘गिलरसीडिया’ फुलांनी लगडले
(फक्त फोटो - देविसिंग राजपूत ०४)
येणेगूर - नळवाडी शिवारातील उस्मान उजळंबे यांच्या बांधावरील गिलरसीडिया वृक्षाला फुले लगडली आहेत. जमीन भुसभुशीत करण्यासाठी वन खात्याकडून या वृक्षाची लागवड वनजमिनीत केली जाते. या वृक्षाची पानगळ झाल्यावर कुजलेल्या पाल्याने जमीन भुसभुशीत होत असल्याचे वनरक्षक तुकाराम दिघोळे यांनी सांगितले.