४५ वर्षापुढील नागरिकांना मंगळवारी मिळणार काेविशिल्डचा पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:31 IST2021-05-17T04:31:19+5:302021-05-17T04:31:19+5:30
उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांचा कल लस घेण्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवस ...

४५ वर्षापुढील नागरिकांना मंगळवारी मिळणार काेविशिल्डचा पहिला डोस
उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांचा कल लस घेण्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवस लसीचा स्टॉक संपल्याने लसीकरण मोहिमेस ब्रेक बसला होता. मात्र, रविवारपासून पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ७० केंद्रावर ४५ वर्षापुढील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस मिळणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक व्यक्ती कोविड प्रतिबंधात्मक लस टोचून घेऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने केंद्राची संख्या २१९ पर्यंत वाढविली होती. मात्र, जिल्ह्यास मागणीच्या तुलनेत लसीचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली होती. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता काही दिवस रोटेशन पद्धतीने लसीकरण करण्यात आले. स्टॉक कमी असल्याने काही दिवस मोजक्याच केंद्रावर लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर रविवारपासून पुन्हा लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. मंगळवारी जिल्ह्यातील ७० केंद्रावर ४५ वर्षापुढील नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्डचा पहिला डोस घेता येणार आहे.
कोट...
४५ वर्षापुढील नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी ९ ते ५ या दरम्यान कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेता येणार आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी नोंदणी अथवा बुकिंग करावी लागणार नाही. मात्र, सोबत आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. लसीकरण केंद्रावर उपलब्ध डोसच्या प्रमाणात टोकण वाटप करण्यात येऊन प्रथम येणाऱ्या नागरिकांना क्रमाने लसीकरण केले जाईल.
डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण अधिकारी
कोणत्या केंद्रांना किती डोस
४४ प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येकी ३०० डोस
११ उपकेंद्र प्रत्येकी २०० डोस
उस्मानाबाद दोन नागरिक प्रा.आ. केंद्र प्रत्येकी ३०० डोस
६ ग्रामीण रुग्णालय प्रत्येकी ३०० डोस
४ उपजिल्हा रुग्णालय प्रत्येकी ३०० डोस
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय प्रत्येकी ५०० डोस
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद प्रत्येकी ५०० डोस
पोलीस रुग्णालय उस्मानाबाद प्रत्येकी ३०० डोस
केवळ फ्रंटलाईन वर्कर