आज मिळणार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST2021-06-23T04:21:57+5:302021-06-23T04:21:57+5:30
उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक ...

आज मिळणार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस
उस्मानाबाद : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी जिल्ह्यातील ५८ केंद्र निश्चित केले असून, या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लस दिली जात
जून महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धाेका टळलेला नाही. तसेच येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांच्या वतीने वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरोना पासून बचाव व्हावा, यासाठी नागरिक पुढे येऊन लस घेत आहेत. मात्र, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस मिळत नव्हती. या वर्गातील नागरिकांतून लस देण्याची मागणी पुढे येत हाेती. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये, २ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी लस उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रावर कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे.