४५ वर्षांपुढील नागरिकांना उद्या मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST2021-05-18T04:33:59+5:302021-05-18T04:33:59+5:30
कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांचा कल लस घेण्याकडे दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केंद्राची ...

४५ वर्षांपुढील नागरिकांना उद्या मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस
कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांचा कल लस घेण्याकडे दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केंद्राची संख्या वाढवून २१९ इतकी केली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत जिल्ह्यास लसीचा पुरवठा होत नसल्याने मोजक्याच केंद्रांवर रोटेशन पद्धतीने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्याने अनेकांना दुसरा डोस घेण्यास विलंब होत होता. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता बुधवारी ४५ वर्षांपुढील नागरिक तसेच अरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांना बुधवारी जिल्ह्यातील ९ लसीकरण केंद्रांवर सकाळी ९ ते सांयकाळी ५ केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना नव्याने टोकन वितरित केले जातील, त्यानुसार क्रमाने लस टोचली जाईल, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.
कोणाला किती लस
जिल्हा रुग्णालय १०००
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ६०००
केवळ फ्रंटलाईन वर्करकरिता
नागरी प्रा. आ. कें. वैराग रोड ३००
नागरी प्रा. आ. कें. रामनगर ३००
पोलीस रुग्णालय उस्मानाबाद २५०
पोलीस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांकरिता
उपजिल्हा रुग्णालय कळंब ५००
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर ५००
उपजिल्हा रुग्णालय उमरगा ५००
उपजिल्हा रुग्णालय परंडा ५००