उद्या ८८ गावांतील नागरिकांना घेता येणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:32+5:302021-06-20T04:22:32+5:30

कोणत्या गावात मिळणार लस उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरवाडी तांडा, गडदेवदरी, तुगाव, हिंगळजवाडी, सुंभा, टाकळी,ईरला, भंडारवाडी, बोरगाव, घुग्गी, तोरंबा, नांदुर्गा, शेकापूर, ...

Citizens of 88 villages will be vaccinated tomorrow | उद्या ८८ गावांतील नागरिकांना घेता येणार लस

उद्या ८८ गावांतील नागरिकांना घेता येणार लस

कोणत्या गावात मिळणार लस

उस्मानाबाद तालुक्यातील जहागीरवाडी तांडा, गडदेवदरी, तुगाव, हिंगळजवाडी, सुंभा, टाकळी,ईरला, भंडारवाडी, बोरगाव, घुग्गी, तोरंबा, नांदुर्गा, शेकापूर, अनसुर्डा, सुर्डी, जुनोनी, देवळाली, उंबरेगव्हाण, राजुरी, लासुना या गावांचा समावेश आहे.

तुळजापूर तालुक्यातील येवती, निळेगाव, लोहगाव, बोलेगाव, वागदरी, येडोळा, दहिवडी, पांगरदारवाडी, खानापूर, पिंपळा बुद्रूक, गंधोरा, कारला, नांदुरी, बिजानवाडी या गावांमध्ये लस मिळणार आहे.

उमरगा तालुक्यातील आष्टा ज. दाबका, कुन्हाळी, वागदरी, आनंदनगर तांडा, सुंदरवाडी, वरनाळ, मुराळी, कंटेकूर, कस्गीवाडी या गावांमध्ये लस घेता येईल.

लोहारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उंडरगांव, कास्ती खुर्द, कोंडजिगड, राजेगाव, हिप्परगा सय्यद, वडगाव वाडी,

भोसगा तांडा, पांढरी को या गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

कळंब तालुक्यातील दाभा, सौदना आंबा, शेलगाव द, उमरा, शिंगोली, खेरडा, वाघोली सातेफळ, कन्हेरवाडी, खोंदला, एकुर्गा, लोहटा पश्चिम या गावातील नागरिकांना लस घेता येणार आहे.

वाशी तालुक्यातील घोडकी, फाकराबाद, तांदुळवाडी, दहिफळ, खामकरवाडी, नंदगाव या गावांचा समावेश आहे.

भूम तालुक्यातील चिंचोली, आंदरुड, बावी, मात्रेवाडी, वांगी बु, वाकवड, वल्हा, अंतरगाव, जेजला, दांडेगाव या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

परंडा तालुक्यातील पिंपळवाडी, आवार पिंपरी, खंडेश्वरी, रत्नापूर, हिंगणगाव, भांडगाव, देवगाव बुद्रूक, देवळगाव या गावांतील नागरिकांना लस मिळणार आहे.

उमरगा उपजिल्हा रुग्णालयांतर्गत महादेव मंदिर सभागृह, मुरुम ग्रामीण रुग्णालयांतर्गत प्रतिभा निकेतन विद्यालय, अहिल्याबाई होळकर समाज मंदिर, कळंब उपजिल्हा रुग्णालयांतर्गत गांधी नगर भागातील संत सेना महाराज मंदिर, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयांतर्गत मंकावती गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिर, परंडा उपजिल्हा रुग्णालयांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी लस उपलब्ध असेल.

Web Title: Citizens of 88 villages will be vaccinated tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.