गोंधळी समाज संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST2021-03-19T04:31:37+5:302021-03-19T04:31:37+5:30

लोहारा : गोंधळी समाज सेवा संघटनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी सागर नेमाजी रेणके तर सचिवपदी बालाजी रमेश रेणके यांची निवड करण्यात ...

Choice of Confused Social Organization office bearers | गोंधळी समाज संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

गोंधळी समाज संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी

लोहारा : गोंधळी समाज सेवा संघटनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी सागर नेमाजी रेणके तर सचिवपदी बालाजी रमेश रेणके यांची निवड करण्यात आली. शहरातील गोंधळी समाजाची गुरुवारी सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश लोंढे व उपजिल्हाध्यक्ष मारुती इगवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी राहुल बालाजी रेणके, सरचिटणीस प्रतीक लक्ष्मण भोरे यांचा समावेश आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश लोंढे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष कुमार इगवे, नगरसेवक बाळासाहेब कोरे, नेमाजी रेणके, चंद्रकांत भोरे, मोहन साळुंखे, तानाजी रेणके आदी उपस्थित होते.

फोटो - लोहारा शहरात गोंधळी समाज सेवा संघटनेच्या युवा पदधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष सतीश लोंढे. समवेत नगरसेवक बाळासाहेब कोरे, कुमार इगवे, नेमाजी रेणके, चंद्रकांत भोरे, मोहन साळुंखे आदी.

Web Title: Choice of Confused Social Organization office bearers