चिंचपूर उपसरपंचाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:32+5:302021-06-29T04:22:32+5:30
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चिंचोली ग्रामपंचायतीने कोरोनाचे सर्व नियम पाळत मासिक बैठक घेऊन ग्रामसभेद्वारे पोखरा समिती गठित ...

चिंचपूर उपसरपंचाचे उपोषण
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चिंचोली ग्रामपंचायतीने कोरोनाचे सर्व नियम पाळत मासिक बैठक घेऊन ग्रामसभेद्वारे पोखरा समिती गठित करण्याचा ठराव घेतला. यानंतर ११ फेब्रुवारीच्या शासन परिपत्रकानुसार कोविड नियमांचे पालन करून ग्रामसभा घेत समितीही गठित केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला. असे असतानाही चिंचोली येथील भास्कर वारे यांनी ‘कोरोना नियमाचे उल्लंघन करीत २६ एप्रिल रोजी ग्रामसभा घेतली. त्यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग झाला’, अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब लिंबराज वारे यांच्या नावे दिली. मात्र, या तक्रारीच्या अनुषंगाने विस्तार अधिकारी यांनी चाैकशी केली असताना यात कसलेही तथ्य आढळले नाही. यावर तक्रारदार वारे यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यामुळे ही चौकशी कळंब गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. त्यांच्या चौकशी अहवालातही तक्रारीच्या अनुषंगाने कुठलेच तथ्य आढळून आले नाही. यावरून तक्रारदार तात्यासाहेब लिंबराज वारे यांच्यावर शासनाची फसवणूक व महिला सरपंच यांची मानहानी केल्याचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी उपसरपंच औदुंबर जेजेराम वारे, ग्रामस्थ शिवलिंग शिर्के, सोमनाथ वारे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
280621\1916-img-20210628-wa0048.jpg
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना चिंचोली ता भूम येथील उपसरपंच यांच्यासह इतर