उस्मानाबाद, गंभीरवाडीत बालविवाह राेखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:45+5:302020-12-29T04:30:45+5:30
उस्मानाबाद - गंभीरवाडी आणि उस्मानाबाद येथील सेवालाल कॉलनीत होणारे दोन नियोजित बालविवाह साेमवारी राेखण्यात आले. पथकाने दाेन्ही बाजूच्या ...

उस्मानाबाद, गंभीरवाडीत बालविवाह राेखले
उस्मानाबाद - गंभीरवाडी आणि उस्मानाबाद येथील सेवालाल कॉलनीत होणारे दोन नियोजित बालविवाह साेमवारी राेखण्यात आले. पथकाने दाेन्ही बाजूच्या पालकांचे समुपदेशन केले. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह लावून देऊ, अशी लेखी हमी त्यांनी दिली.
कळंब तालुक्यातील गंभीरवाडी व उस्मानाबाद शहरामध्ये प्रत्येकी एक असे दाेन बालविवाह हाेणार असल्याची माहिती बालविवाह प्रतिबंध समितीला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. निपाणीकर, कळंबचे प्रकल्प अधिकारी व्ही. व्ही. सागळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए. बी. काेवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह प्रतिबंध समिती सदस्या ज्योती सपाटे यांनी दाेन्ही बाजूच्या नातेवाइकांची भेट घेऊन समुपदेशन केले. तसेच त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. यावेळी सुपरवायझर ए. पी. मोहिते, विभावरी खुने, समुपदेशक कोमल धनवडे, प्रज्ञा बनसोडे, गंभीरवाडीचे ग्रामसेवक व्ही. के. लांडगे, अंगणवाडी कार्यकर्ती गंगाबाई देवकर, अर्चना देवकर, पोलीस हवालदार ए. बी. नाईकवाडी व बी. डी. तांबडे, पोलीस पाटील अशोक माने, संतोष देवकर, औदुंबर माने, पांडुरंग गव्हाणे, अश्रुबा गाडे, अश्विनी गव्हाने, बालाजी गुंड व नवनाथ गव्हाणे आदी उपस्थित हाेते. दरम्यान, यानंतर अशाच पद्धतीने उस्मानाबाद शहरातील नियाेजित बालविवाह वाॅर्ड बाल संरक्षण समितीच्या पुढाकारातून थांबविण्यात आला. यांच्याकडूनही लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे.