चिखली ग्रामपंचायतीस लाखाचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:02 IST2021-02-28T05:02:20+5:302021-02-28T05:02:20+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील चिखली गावास भारतीय आयुर्विमा महामंडळाच्यावतीने बिमा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीला एक लाख रुपयाचे ...

Chikhali Gram Panchayat award of Rs | चिखली ग्रामपंचायतीस लाखाचा पुरस्कार

चिखली ग्रामपंचायतीस लाखाचा पुरस्कार

उस्मानाबाद : तालुक्यातील चिखली गावास भारतीय आयुर्विमा महामंडळाच्यावतीने बिमा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीला एक लाख रुपयाचे बक्षीसदेखील मिळाले असून, पंचायतीच्या खात्यावर ती रक्कम जमा करण्यात आली आहे. गुरुवारी साध्या पद्धतीने कार्यक्रम घेऊन हा निधी सुपूर्द करण्यात आला. चिखली येथील विमा प्रतिनिधी तानाजी गवळी व वैभव साळुंखे यांनी गावातील शंभर लोकांच्या विमा पॉलिसी काढल्या होत्या. या पुरस्कारामध्ये ग्रामविकासासाठी एक लाख रुपयांचा निधीदेखील मिळतो. ग्रामविकासासाठी या एक लाख रुपयाची अत्यंत चांगली मदत होणार असल्याचे मत सरपंच वृंदावणी जाधवर यांनी व्यक्त केले. यावेळी उपसरपंच उत्रेश्वर जाधव, सदस्य मार्तंड भोजणे, तेजस सुरवसे, विकास जाधव, संजय गोडसे, बापू जावळे, प्रीती कदम, व्यंकटेश जाधव, आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाखाधिकारी एच. डी. माशाळ, उपशाखाधिकारी श्री. डी. पाटील, विकास अधिकारी अनिल गोले, प्रमोद कुलकर्णी, विमा प्रतिनिधी तानाजी गवळी व वैभव साळुंखे यांची उपस्थिती होती.

Web Title: Chikhali Gram Panchayat award of Rs