नाईकनगरमध्ये जाधव, राठोड यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:35+5:302021-02-10T04:32:35+5:30
मुरुम : उमरगा तालुक्यातील नाईकनगर (मुरुम) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रितेश रमेश जाधव यांची तर उपसरपंचपदी वालचंद ठाकरु राठोड यांची सोमवारी ...

नाईकनगरमध्ये जाधव, राठोड यांची वर्णी
मुरुम : उमरगा तालुक्यातील नाईकनगर (मुरुम) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रितेश रमेश जाधव यांची तर उपसरपंचपदी वालचंद ठाकरु राठोड यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.या निवडीसाठी सोमवारी बैठक पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी रितेश जाधव व कल्पना राठोड यांचे तर उपसरपंच पदासाठी वालचंद राठोड आणि अरुण राठोड यांचे अर्ज आले होते. मात्र, यापैकी कल्पना राठोड व अरुण राठोड या दोघांनी अर्ज मागे घेतल्याने सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेरेकर व ग्रामसेवक माने यांनी काम पाहिले. नाईकनगर (मु) ग्रामपंचायतीच्या सात पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे फक्त एका जागेसाठी निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसचे रितेश जाधव विजयी झाले होते.