शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST

गुणवंत जाधवर उमरगा : प्रत्येक वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य आहे. मात्र, वीज बिल चुकविण्यासाठी काही ...

गुणवंत जाधवर

उमरगा : प्रत्येक वीज ग्राहकांनी वापरलेल्या वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य आहे. मात्र, वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून विद्युत ‘महावितरण’ची फसवणूक करतात. वीज चोरी उघड झाल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी स्वरुपाची कारवाई होऊन प्रसंगी तुरुंगाची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते तसेच संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो.

मुंबईवगळता ‘महावितरण’कडून राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जातात. मीटर रीडिंगनुसार वीज बिलांची आकारणी केली जाते. वीजबिल चुकविण्यासाठी काही ग्राहक चक्क मीटरमध्येच फेरफार करतात. वीज चोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत अधिनियम २००३ कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे याच्या गंभीर परिणामाला ग्राहकाला तोंड द्यावे लागते.

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

वर्ष कारवाया

२०१९ - ३७

२०२० - २१

२०२१ - ०१

मीटर जप्ती व मोठा दंड

कायद्याने वीज चोरी करणे गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीज चोरी पकडली गेल्यास त्याला चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो.

हा पर्याय स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाऊ शकतो. तथापी, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर मीटर जप्त करून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते.

कधीही होऊ शकते मीटरची तपासणी

‘महावितरण’तर्फे विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

हे पथक सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीज चाेरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कोणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके तत्काळ तेथे जातात.

पथकातील अधिकारी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची कधीही तपासणी करू शकतात.

कोट.........

विद्युत ग्राहकांनी वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. नवीन तंत्रज्ञानानुसार मीटरमध्ये फेरफार केल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या मुंबई वरिष्ठ कार्यालयात आपोआप समजते. तेथून तत्काळ ही माहिती उपविभागीय कार्यालयापर्यंत येते. अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. यामुळे ग्राहकांनी वीज चोरी करू नये.

- आर. एम. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय उमरगा