नगर पालिकेकडून प्रमाणपत्र शुल्क वाढ
By Admin | Updated: April 8, 2015 00:50 IST2015-04-08T00:45:09+5:302015-04-08T00:50:13+5:30
परंडा : नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये मोठी वाढ प्रस्तावित केलेली असतानाच आता विविध प्रमाणपत्र आणि व्यवसाय परवाना शुल्कामध्येही वाढ केली आहे.

नगर पालिकेकडून प्रमाणपत्र शुल्क वाढ
परंडा : नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये मोठी वाढ प्रस्तावित केलेली असतानाच आता विविध प्रमाणपत्र आणि व्यवसाय परवाना शुल्कामध्येही वाढ केली आहे. याचा फटका व्यवसायिकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे.
नगर परिषदेकडून २०१५-१६ ते २००१८-१९ या चार वर्षाकरिता प्रस्तावित करवाढीच्या नोटिसा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. सदरील करवाढ ही अन्यायकारक असल्याची ओरड जनतेतून होत असतानाच आता विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कामाध्ये १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायिक व नागरिकांना याचा फटका सोसावा लागणार आहे. व्यवसाय परवाना, रहिवाशी प्रमाणपत्र, ना हरकत, जन्म-मृत्यू प्रमाणप, नळ कनेक्शन, मालमत्ता नोंद, नक्कल शुल्क, विवाह नोंदणी, बेबाकी प्रमाणपत्र अशा विवध प्रमाणपत्रांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व घटकातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.