कळंब : केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण न ठेवल्याने सर्वसामान्य तसेच गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. मागील सात वर्षाच्या काळात शेतकरी, अल्पसंख्यांक, युवक, महिला आदी घटकांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. देशात काँग्रेसला पर्याय नाही, हे पुन्हा सिद्ध झाले असून, आगामी निवडणुकात काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार करा, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा ज्योती सपाटे यांनी केले.
कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस, शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहरातील विविध भागातील महिलांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. या मेळाव्यामध्ये महिलांच्या विविध समस्या, महिलांमधील जनजागृती,महिला आरक्षण, महिलांचा समाजातील अस्तित्व व राजकारणातील सहभाग या सर्व विषयावर चर्चा झाली.
यावेळी इंदू तनपुरे, अंकिता देशमुख, शैला चोंदे, सोनाली शिंदे, संध्या कदम, प्रमिला बोराडे, शकुंतला माकोडे, वैशाली धावारे, आरती गव्हाणकर, अश्विनी सुरवसे, पार्वती कवडे, राणी यादव, सारिका लांडगे, सुजाता दीक्षित, मीरा दोडके, माया माने, दैवशाला पाटोळे, सुकेशिनी सावंत, गिरीजा गरड, सुनंदा काळे, रेखा कसबे, प्रीती कुचेकर, निर्मला कसबे, रिना खिल्लारे, इंदुबाई उखाडे, चांदणी कांगणे, दैवशाला ठेवले, आयशा पठाण, शबनम शेख, रजिया शेख, अंजूम शेख, नौशाद शेख, जमीन सय्यद, फराह शेख, आयेशा पठाण, शबनम शेख, आली मून शेख, सीमा हळे, अशा पांचाळ, ज्योती पांचाळ, जाकिर चाऊस, शाहीन सय्यद, नसरीन शेख, शीला घाडगे, बेबी पिंगारे, शितल गायकवाड, प्रेमा धीमधीमे, शोभा गिरी, कमल पुरी आदी महिला उपस्थित होत्या.