अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने तत्काळ मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST2021-02-14T04:30:07+5:302021-02-14T04:30:07+5:30

उस्मानाबाद : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या ...

The Center should provide immediate relief to the farmers affected by heavy rains | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने तत्काळ मदत द्यावी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राने तत्काळ मदत द्यावी

उस्मानाबाद : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या माध्यमातून चर्चेत भाग घेऊन केली.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद जिल्ह्यासह, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांचे २ लाख ६२ हजार हेक्टर, बार्शी तालुक्यात ७५ हजार ७८१ शेतकऱ्यांचे ६८ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र तर लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुक्यातील १ लाख ५२ हजार ४१७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ७७७ हेक्टर शेती क्षेत्राचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना भरपाईपोटी ४५८ कोटी ६८ लाख एवढी भरीव मदत दिली. परंतु केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही. तरी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने एनडीआरएफमधून तत्काळ मदत करावी. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे एनडीआरएफमधून राज्य शासनाच्या ३ हजार ४२१ कोटी रु.चा प्रस्ताव मंजूर करून निधी राज्य शासनाला देण्यात यावा, अशी मागणी खा. राजेनिंबाळकर यांनी केली.

Web Title: The Center should provide immediate relief to the farmers affected by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.