‘राकाॅंं’ सांस्कृतिक विभागाकडून नामविस्तार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST2021-01-16T04:36:43+5:302021-01-16T04:36:43+5:30
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काॅंंग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. सायंकाळी ...

‘राकाॅंं’ सांस्कृतिक विभागाकडून नामविस्तार दिन साजरा
उस्मानाबाद - राष्ट्रवादी काॅंंग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.
सायंकाळी ५ वाजता सुहास सदाफुले यांच्या बुद्ध भिमगीतांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर नामांतराच्या लढ्यात सहभागी असलेल्या दादासाहेब जेटीथोर, कमलाकर बनसोडे, भिमराव हजारे, अरूण बनसोडे, बाबूराव बनसोडे, प्रेमचंद बनसोडे, बाबा बनसोडे, राजा ओव्हाळ, सुनिल बनसोडे, अनिल बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आयाेजक विशाल शिंगाडे, सागर चव्हाण, सुगत सोनवणे, महेश डावरे, अजय चिलवंत, विजय हजारे, गुणवंत सोनवणे, धनंजय वाघमारे, उत्तम बनसोडे, मेसा जानराव, विजय उंबरे, ताहेर शेख, सुहास झेंडे, प्रदिप गायकवाड, प्रशांत सोनवणे, अमोल झेंडे, प्रताप राऊत, आकाश जानराव, सत्यजीत माने, यशवंत शिंगाडे, प्रशांत कांबळे, सारीपूत शिंगाडे, प्रशांत बनसोडे, अजिंक्य कांबळे आदी उपस्थित हाेते. सूत्रसंचलन विशाल शिंगाडे यांनी तर आभार महेश डावरे यांनी मानले.