काक्रंबा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:29+5:302021-08-19T04:35:29+5:30
काक्रंबा ग्रामपंचायत कार्यालय काक्रंबा : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वर्षा बंडगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच अरविंद ...

काक्रंबा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
काक्रंबा ग्रामपंचायत कार्यालय
काक्रंबा : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वर्षा बंडगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच अरविंद कानडे, ग्रा.पं. सदस्य अनिल बंडगर, उमेश पाटील, शुभांगी साबळे, निवृत्ती माळी, उमेश पांडागळे, विनोद साबळे, आप्पासाहेब कानडे, महादेव गायकवाड, प्रभाकर राऊत, अशोक कंदले, बापू सुरवसे, लक्ष्मण धोंगडे, अर्जुन कोळेकर, शिवाजी सुरवसे, शशिकांत पांडागळे आदी उपस्थित होते.
हनुमान विद्यालय, घारगाव
घारगाव : कळंब तालुक्यातील घारगाव येथील हनुमान विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण मुख्याध्यापक ए. बी. जाधवर, पर्यवेक्षक एम. ए. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शालेय समिती अध्यक्ष हनुमंत घाटुळे, सहशिक्षक यू. डी. साळुंके, पाटील आदींची उपस्थिती होती. घारगाव ग्रामपंचायतीत सरपंच काकासाहेब लोमटे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास जि.प.चे बोईनवाड, हनुमान विद्यालयाचे बी.डी. ससाणे, उपसरपंच अरुण कांबळे, माजी उपसरपंच अनिल साळुंके, तलाठी गायकवाड, पोलीस पाटील विनायक साळुंके, लालासाहेब साळुंके, अभय कुंभकर्ण यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
170821\2432img-20210816-wa0075.jpg
काक्रंबा येथील जि प प्राथमिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करताना