अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:30 IST2021-01-18T04:30:01+5:302021-01-18T04:30:01+5:30

उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ‘ज्ञान शिदोरी ...

Celebrating the birthday of Abhaykumar Salunkhe | अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस साजरा

अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस साजरा

उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ‘ज्ञान शिदोरी दिन’ म्हणून प्राचार्य डाॅ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यानिमित्त वाचन संस्कृती वाढावी यासाठी व विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकाकडून पुस्तके भेट स्वरूपात घेण्यात आली होती. त्याचे आज प्रदर्शन भरविण्यात आले. याचे उद्‌घाटन प्रभारी प्राचार्य प्रा. डाॅ. ए. बी. इंदलकर यांच्या हस्ते झाले. नंतर ही पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली. यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील ब्लड बँक व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी, शिक्षकांनी रक्तदान केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. बबन सूर्यवंशी, प्रा. डाॅ. देविदास इंगळे, प्रा. डी. एम. शिंदे, प्रा. डाॅ. घोडके, प्रा. बालाजी नगरे, प्रा. स्वाती बैनवाड, प्रा. मोहन राठोड उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. माधव उगीले यांनी तर आभार प्रा. डाॅ. केशव क्षीरसागर यांनी मानले.

Web Title: Celebrating the birthday of Abhaykumar Salunkhe