प्रजासत्ताक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:05+5:302021-02-05T08:15:05+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षक के. एम. शेख यांच्या ...

प्रजासत्ताक दिन साजरा
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षक के. एम. शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राठोड, पर्यवेक्षक शेख, मुख्याध्यापक शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. पाटील, खबोले, बडदापुरे, पडवळ, कांबळे, शानिमे, कुंभार, कर्मचारी माळी, बनसोडे, मस्के, चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. बी. पाटील यांनी केले. अनुमोदन व्यवहारे यांनी तर आभार जाधव यांनी मानले.
धिरूभाई अंबानी विद्यालय
उस्मानाबाद : येथील धिरूभाई अंबानी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात अशोक वाघमारे, संस्थाध्यक्ष सुखदेव लोमटे, पद्माकर लोमटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन के. बी. खोसे यांनी केले तर आभार ए. एच. सारडे यांनी मानले.
ग्रामपंचायत कार्यालय, पारगाव
पारगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक सुरेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉ. पंकज चव्हाण, धनंजय मोटे, राजाभाऊ कोळी, आशाबाई औताने, समाधान मोटे, श्रीमंत निगुळे, हनुमंत मोटे, आर. ए. डोके, गणेश मोटे, रुक्मिणी गायकवाड, पद्मिन खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जयप्रकाश विद्यालय, रूईभर
उस्मानाबाद : तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रा. जयप्रकाश कोळगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रामदास कोळगे, राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, मुख्याध्यापिका शिवकन्या साळुंके, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे उपस्थित होते.
पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय
उस्मानाबाद : येथील के. टी. पाटील संगणकशास्त्र, वाणिज्य, एमबीए, नर्सिंग, बी. फार्मसी, एम. फार्मसी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी के. टी. पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोशी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
स्वतंत्र चौकट............
ऊसतोड मजुराच्या हस्ते ध्वजारोहण
कळंब : ज्यांच्या कष्टाच्या बळावर उद्योगाचा डोलारा उभा असतो अशा कष्टकऱ्यांच्या श्रमाचे मोल करणाऱ्या चोराखळी येथील धाराशीव कारखान्याच्या व्यवस्थापनाने ध्वजारोहणाचा मानही ऊसतोड कामगारांना दिला.
कोणत्याही उद्योग समूहाच्या यशात मालकाच्या ‘धोरणी’ व्यवस्थापनाचा मोठा वाटा असतो. शिवाय साखर उद्योगाचा विचार करता ऊसतोड कामगार ते वाहतूक यंत्रणा, शेतकरी ते कामगार यांचे योगदानही दखलपात्र असते. यामुळेच या घटकांना वेळोवेळी सन्मानित करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील नेहमी आग्रही असतात. यातूनच मध्यंतरी त्यांनी साखर पोत्यांचे पूजन शेतकऱ्यांच्या मुलांच्या हस्ते करून ‘गव्हाण ते साखर’ ही गाळपाची प्रक्रिया दाखवली होती. मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काराखानास्थळी होणाऱ्या ध्वजारोहणाचा मानही कष्टकऱ्यांना देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यानुसार ऊसतोड व त्याची बैलगाडीतून कारखान्यात वाहतूक करणाऱ्या रामभाऊ कदम व बैलगाडी मुकादम राजकुमार कदम या कष्टकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.