स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:27+5:302021-08-17T04:37:27+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास ...

Celebrate the 74th anniversary of Independence Day with enthusiasm | स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जनतेला उद्देशून भाषण केले. यावेळी विविध कोरोनायोद्धा आणि इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते देण्यात आले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते कोरोना महामारी काळात उत्कृष्ट कार्य केल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील रो.ह.यो.चे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार तुषार बोरकर, वाहनचालक राघवेंद्र जमादार तसेच महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नितीन देविदास चौधरी, कळंब तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी अनिल चांगदेव अहिरे, महसूल सहायक हर्षनंद कांबळे, तुळजापूर तहसील कार्यालयातील तलाठी ए.जी.भातभागे, भूम तहसील कार्यालयातील वाहनचालक चंद्रकांत साळुंके, वाशी तहसील कार्यालयातील कोतवाल एम. सी. राऊत, लोहारा तहसील कार्यालयातील शिपाई अशोक क्षीरसागर, परंडा तहसील कार्यालयातील पोलीस पाटील संजय कदम आदी, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील, ग्रामीण रुग्णालय नळदुर्ग येथील कोविड नोडल ऑफिसर तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. इस्माईल मुल्ला, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. सचिन बोडके, डॉ. सतीश आदटराव, डॉ. स्नेहल तांबारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता निलांबरी कुलकर्णी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, सहायक पोलीस निरीक्षक, दहशतवादविरोधी पथकाचे संदीप मोदे, भूम पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे, जिल्हा विशेष शाखा उस्मानाबादचे पोना दीपक जाधव, उस्मानाबाद शहर पोलीस ठाणेचे कॉन्स्टेबल सच्चिदानंद स्वामी, पोना सायलू बिरमवार आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Celebrate the 74th anniversary of Independence Day with enthusiasm