शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या ट्रेलरला कारची धडक, तरुण गतप्राण

By चेतनकुमार धनुरे | Updated: March 11, 2023 18:59 IST

ढोकी गावानजीकच्या एका हॉटेलजवळ येताच समोरील उसाने भरलेल्या ट्रेलरला कारची जोराची धडक बसली.

ढोकी (जि. धाराशिव) : येथील कळंब रोडवर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात कळ॔ंब तालुक्यातील माळकरंजा येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कळ॔ंब तालुक्यातील माळकरंजा येथील संतोष सुरेश तुपसौंदर्य (३५) हा तरुण शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त गावातून ढोकीकडे निघाला होता. आपल्या कारने तो एकटाच निघाला होता. दरम्यान, ढोकी गावानजीकच्या एका हॉटेलजवळ येताच समोरील उसाने भरलेल्या ट्रेलरला त्याच्या कारची जोराची धडक बसली. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा दरवाजा तोडून संतोषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला सारुन पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. मृत संतोषचे ढोकी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता संतोषच्या पार्थिवावर माळकरंजा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.एकुलता आधार गेला...

संतोष तुपसौंदर्य हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. संतोषच्या एकुलत्या बहिणीचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकुलता आधार असलेल्या संतोषचा ही अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांचा आधारच हरपला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातOsmanabadउस्मानाबाद