शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परांड्यात मविआत दोघांना उमेदवारी! शरद पवार गटाचीही दावेदारी; उध्दवसेना माघार घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:58 IST

राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

- चेतन धनुरेधाराशिव : उध्दवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. राहुल मोटे यांनी शुक्रवारीच एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राष्ट्रवादी (श.प.)चा परांडा मतदारसंघावर दावा होता. तरीही उध्दवसेनेने पहिल्या यादीत दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. परांडामध्ये राष्ट्रवादी (श.प.) ने उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमधील जागावाटपाबाबत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी (श.प.) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत म्हणाले की, उध्दवसेनेशी चर्चा करून यातून मार्ग काढू.

दरम्यान, राहुल मोटे यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज दाखल केला आहे. तर उध्दवसेनेचे रणजित पाटील यांनी उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज दाखल केलेला नाही. मोटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उध्दवसेनेचा उमेदवार या मतदारसंघातून माघार घेणार का, हे पाहावे लागणार आहे. रणजित पाटील यांनी माघार घेतल्यास मोटे यांची लढत शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री तानाजी सावंत यांच्याशी होईल.

पक्षाची मला अधिकृत उमेदवारीपक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मी मंगळवारी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.- रणजित पाटील.

कोण आहेत राहुल मोटे?राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००४, २००९ आणि २०१४ या तीन निवडणुकांत विजय मिळविला आहे. मोटे यांनी रणजित पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांचा दोन वेळा पराभव केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparanda-acपरांडा