बसचालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST2021-01-13T05:23:40+5:302021-01-13T05:23:40+5:30

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खु.) येथील सुहास शंकर पवार (वय २८) हे मागील चार ते ...

Bus driver commits suicide by strangulation | बसचालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या

बसचालक तरुणाची गळफास लावून आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खु.) येथील सुहास शंकर पवार (वय २८) हे मागील चार ते पाच वर्षांपासून करमाळा आगारात बसचालक म्हणून कार्यरत हाेते. साप्ताहिक सुटी असल्याने ते गावाकडे आले हाेते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्यांच्या पाेटात दुखत हाेते. तपासणीअंती किडनी निकामी झाल्याबाबत रिपाेर्ट आला हाेता. या आजाराला कंटाळूनच त्यांनी रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी सुसाइड नाेटही आढळून आली आहे. ‘‘आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहाेत. त्यामुळे माझ्या मृत्यूला काेणासही जबाबदार धरले जाऊ नये’’ असे संबंधित नाेटमध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे पवार कुटुंबियांवर दुःखाचा डाेंगर काेसळला आहे. सुहास यांच्या पश्चात आई, लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

चाैकट...

लाॅकडाऊनच्या काळात ठरला हाेता विवाह

सुहास पवार यांच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वीच हृदयविकाराने निधन झाले हाेते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सुहासवर हाेती. लाॅकडाऊनच्या काळात सुहासचा गावातीलच मुलीसाेबत विवाह ठरला हाेता. मात्र, विवाह हाेण्यापूर्वीच आजाराला कंटाळून त्याने आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलले. त्यामुळे संपूर्ण गावावर शाेककळा पसरली आहे.

100121\10osm_1_10012021_41.jpg

सुहास शंकर पवार (मयत)

Web Title: Bus driver commits suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.