सराफा दुकानदाराने सराफाकडेच मागितली ५० हजारांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST2021-05-23T04:32:10+5:302021-05-23T04:32:10+5:30

परंडा - ‘‘५० हजार रूपये दे, अन्यथा तुला चाेरीचे साेने खरेदीच्या खाेट्या गुन्ह्यात आकडवीन’’, अशा शब्दात धमकी देत ...

The bullion shopkeeper demanded a ransom of Rs 50,000 from the bullion dealer | सराफा दुकानदाराने सराफाकडेच मागितली ५० हजारांची खंडणी

सराफा दुकानदाराने सराफाकडेच मागितली ५० हजारांची खंडणी

परंडा - ‘‘५० हजार रूपये दे, अन्यथा तुला चाेरीचे साेने खरेदीच्या खाेट्या गुन्ह्यात आकडवीन’’, अशा शब्दात धमकी देत शहरातील एका सराफा दुकानदारानेच अन्य एका सराफाकडे खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना २० मेच्या रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संबंधिताविरूद्ध परंडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सराफा दुकानदार अभिजीत पेंडगावकर (दहिवाळ) हे गुरूवारी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास सराफा सुरेश बागडे यांच्या शहरातील कुर्डूवाडी रस्त्यावरील घरी गेले. ‘‘मला चाेरीचे साेने खरेदी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अटक केली होती. याची माहिती तूच त्यांना दिली होती. त्यामुळे माझे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील केसमध्ये माझा झालेला सर्व खर्च दे’’, असे म्हणत ५० हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली. ५० हजार नाही दिल्यास तुला साेने चाेरीच्या खाेट्या गुन्ह्यात आडकवून तुझा गेम करीन, अशी धमकीही दिल्याचे सुरेश बागडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सराफा अभिजित पेडगावकर यांच्या विरूद्ध भादंसंचे कलम ३९४, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक राजकुमार ससाने हे करीत आहेत.

Web Title: The bullion shopkeeper demanded a ransom of Rs 50,000 from the bullion dealer