बायपास रस्त्यावर उड्डाणपूल बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST2021-04-06T04:31:20+5:302021-04-06T04:31:20+5:30
उस्मानाबाद : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर तुळजापूर येथील बायपास रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त समजताच खा. ...

बायपास रस्त्यावर उड्डाणपूल बांधा
उस्मानाबाद : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर तुळजापूर येथील बायपास रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त समजताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या ाप्रकल्प संचालकांना या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना केल्या आहेत.
तुळजापूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहराच्या बाहेर रिंगरोड बनवला असून, सदर रिंगरोड दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा असल्याने कायम रहदारीचा आहे. तुळजापूर शहरापासून साधारण तीन किमी अंतरावर परवा तीन वाहनांचा अपघात घडला. तसेच याठिकाणी मागील ६ महिन्यांपासून सातत्याने अपघात होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते.
दरम्यान, परवाच्या अपघातानंतर नागरिकांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याची निदर्शनास आणून दिली. यावरून खा. राजेनिंबायकर यांनी
संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभागाच्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना केल्या. तसेच रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक, रेडीयम साइनबोर्ड व ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.