शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तर वर्षा बंगल्यावर गाय बांधू; अजित पवारांचे हल्लाबोल आंदोलनातून मुख्यमंत्र्यांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:27 IST

जगाचा पोशिंदा जगला तर देश जगेल; पण या सरकारला शेतकर्‍यांशी काहीच देणे-घेणे नाही. ते निव्वळ फसव्या घोषणा करतात. स्वत: मुख्यमंत्री सभागृहात आपण शेतकरी असल्याचे सांगतात. असे असेल तर वर्षा बंगल्यावर गाय नेऊन बांधतो, त्यांनी दूध काढून दाखवावी, असे आव्हान अजित पवार यांनी आज भूम येथून दिले.

भूम ( उस्मानाबाद ) : जगाचा पोशिंदा जगला तर देश जगेल; पण या सरकारला शेतकर्‍यांशी काहीच देणे-घेणे नाही. ते निव्वळ फसव्या घोषणा करतात. स्वत: मुख्यमंत्री सभागृहात आपण शेतकरी असल्याचे सांगतात. असे असेल तर वर्षा बंगल्यावर गाय नेऊन बांधतो, त्यांनी दूध काढून दाखवावी, असे आव्हान अजित पवार यांनी आज भूम येथून दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूम (जि. उस्मानाबाद) येथे बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मंचावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. राहुल मोटे, आ. राणाजगजितसिंह पाटील, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, अर्चना पाटील, वैशाली मोटे, तालुकाध्यक्ष हणमंत पाटुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टिका केली. 

येत्या निवडणुकीत सरकार हद्दपार कराकर्जमाफी, दुधाचा भाव, शेतीमालाचे हमीभाव, भारनियमन यांसह इतर सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना येत्या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन पवार यांनी केले. शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतानाही सरकार शांत बसून आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारने फसवी कर्जमाफी केली. शेती अडचणीत आली असताना पशुपालनाचा जोडधंदाही सरकारने अडचणीत आणला आहे. दुधाला भाव नाही. विचारल्यास दुग्धमंत्री अभ्यास चालू आहे असे सांगतात. असेच राहिले तर शेतकर्‍यांचे कसे होणार? अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली. सभेनंतर नेत्यांसह पदाधिकार्‍यांनी भूम येथील उपविभागीय अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देऊन सरकारला भावना कळविण्याची सूचना केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे