संपत्तीच्या वादातून भावाचा खून; आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 07:30 PM2019-12-03T19:30:18+5:302019-12-03T19:31:45+5:30

सुनावण्यांमध्ये सरकार पक्षातर्फे  ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.

Brother's murder from a property dispute; Lifetime of the accused | संपत्तीच्या वादातून भावाचा खून; आरोपीस जन्मठेप

संपत्तीच्या वादातून भावाचा खून; आरोपीस जन्मठेप

googlenewsNext
ठळक मुद्देमयताची पत्नी व लहान मुलाची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष महत्वपूर्ण

भूम (जि़उस्मानाबाद) : संपत्तीच्या वादातून स्वत:च्या भावाचा खून करणाऱ्या एका आरोपीस भूमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली़ शिवाय, ५ हजार रुपयांचा दंडही सत्र न्या़आऱव्ही़ उत्पात यांनी सुनावला आहे़

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील रहिवासी बप्पा छमा काळे व राजेंद्र छमा काळे यांच्यात संपत्तीवरुन वाद निर्माण झाला होता़ याच कारणावरुन राजेंद्र काळे याने मद्यपान करुन बप्पा काळे यांचा चाकूने भोसकून खून केला़ याप्रकरणी येरमाळा ठाण्यात ९ एप्रिल २०१७ रोजी खुनाचा गुन्हा करण्यात आला होता़ पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन तपास पूर्ण करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़ यानंतर चाललेल्या सुनावण्यांमध्ये सरकार पक्षातर्फे  ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.

त्यातही मयताची पत्नी व लहान मुलाची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष महत्वपूर्ण ठरली़ शिवाय, इतर परिस्थितीजन्य पुरावे व वैद्यकीय अहवाल अतिरिक्त सरकारी अभियोक्ता किरण कोळपे यांनी न्यायालयासमोर मांडत सरकारी पक्षातर्फे खिंड लढविली़ पैरवी अधिकारी म्हणून बाजीराव बळे यांनी मोलाची कामगिरी बजावली़ एकूणच पुरावे, साक्षी व युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या़आऱव्ही़ उत्पात यांनी आरोपी राजेंद्र काळे यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ शिवाय, ५ हजार रुपयांचा दंडही आरोपीस ठोठावण्यात आला आहे़

Web Title: Brother's murder from a property dispute; Lifetime of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.