भावाने भावावर केले चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST2021-05-23T04:32:12+5:302021-05-23T04:32:12+5:30

तेर : शेतातील घरासमोर टाकलेला कचरा काढण्याच्या कारणावरून दोन भावंडात झालेल्या भांडणात भावानेच भावावर चाकूने वार केल्याची घटना तेर ...

The brother stabbed the brother | भावाने भावावर केले चाकूने वार

भावाने भावावर केले चाकूने वार

तेर : शेतातील घरासमोर टाकलेला कचरा काढण्याच्या कारणावरून दोन भावंडात झालेल्या भांडणात भावानेच भावावर चाकूने वार केल्याची घटना तेर येथे घडली. यावेळी वडिलांनीही मुलाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेर येथील शंकर गुरूलिंग झाडे यांची पानवाडी गावालगत तेर शिवारात शेती आहे. १७ मे रोजी फिर्यादी गणेश झाडे यांनी वडील शंकर व भाऊ संतोष यांना शेतात असणाऱ्या आपल्या घरासमोरील कचरा काढा, मला जाण्या-येण्यास अडथळा होत आहे, असे सांगितले. यावर आम्ही काढत नाही, तुला काय करायचे ते कर, असे संतोष व वडीलांने गणेशला सुनावले. यावरून संतोष झाडे याने गणेश झाडे यांच्या दंडावर व छातीवर कांदा कापण्याचा चाकूने वार केले तर वडिल शंकर झाडे यांनी गणेशच्या डोक्यात लाकडाने मारहाण करून जखमी केले.

जखमी गणेश झाडे यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला असून, यावरून ढोकी पोलिस ठाण्यात भाऊ संतोष झाडे, वडील शंकर झाडे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अंमलदार प्रदीप मुरळीकर करीत आहेत.

Web Title: The brother stabbed the brother