कळंब पालिकेवर सेनेची सत्ता आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:38+5:302021-06-17T04:22:38+5:30
कळंब - नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागून पालिकेवर एकहाती ...

कळंब पालिकेवर सेनेची सत्ता आणा
कळंब - नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागून पालिकेवर एकहाती सत्ता आणण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे राज्य संघटक गाेविंद घाेळवे यांनी केले.
कळंब येथील शिवसेना कार्यालयात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर सेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, तालुका उपप्रमुख भारत सांगळे, उपशहर प्रमुख अजित गुरव यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
घाेळवे म्हणाले की, पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शांत न बसता आतापासून कामाला लागावे. यावेळी कुठल्याही परिस्थितीत पालिकेवर सेनेचाच झेंड फडकला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने घाेळवे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात सेनेची सत्ता आहे. खासदार, आमदारही सेनेचेच आहेत. कुठलाही प्रश्न आला तरी ताे तातडीने साेडवला जाताे. पक्षनेतृत्वाची आम्हाला खंबरी साथ आहे. त्यामुळे यावेळी पालिकेवर सेनेचाच झेंडा फडकेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बैठकीस शहर अध्यक्ष प्रदीप मेटे, उदय खंडागळे, दादा खंडागळे आदींची उपस्थिती हाेती.