शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बायकोनं छळलंय वो... 54 पत्नीपीडित पुरूषांची सहाय्यता कक्षात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 18:01 IST

तक्रार : विभक्त राहण्याच्या मागणीचा अधिक त्रास

सूरज पाचपिंडे

उस्मानाबाद : विवाहित महिलांचा विविध कारणांनी जाच करणाºया पतीसह सासरच्या मंडळींवर वेळोवेळी गुन्हे दाखल होत आले आहेत़ त्यात आता पत्नीच्या सततच्या कुरबुरीमुळे वैतागलेल्या जिल्ह्यातील 54 पुरूषांनी सामाजिक संस्थांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सहाय्यता कक्षात न्यायासाठी धाव घेतली आहे. एकत्रित कुटुंबातून विभक्त राहणे, सतत संशय घेणे, मोबाईलमध्ये मशगुल राहणे आदी कारणांनी आपण पत्नीमुळे त्रस्त झाल्याच्या तक्रारी पुरुषांनी केल्या आहेत.

उस्मानाबाद शहरातील सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला व मुलांकरिता सहाय्यता कक्षात वर्षभरात 33 पुरुषांनी अर्ज केले होते़ तर वाशी तालुक्यातील ईट येथील डॉ. इक्बाल ग्रामविकास मंडळाच्या कक्षात 8 पत्नीपिडीतांनी तक्रारी केल्या होत्या़ कळंब येथील लोकप्रतिष्ठाण संस्था उस्मानाबाद या संस्थेकडे 8 पत्नीपीडितांनी अर्ज केले होते. तसेच उमरगा येथील त्रिरत्न महिला बहुउद्देशिय संस्थेकडे 5 पुरुषांनी वर्षभरात तक्रारी केल्या आहेत़ जिल्ह्यातील या चार ठिकाणी झालेल्या तक्रारीत पत्नी सतत माहेरी जाणे, सासू- सासऱ्यापासून विभक्त राहण्याचा अट्टाहास, सततचा संशय, पत्नीकडून चार चौघांत शिवगाळ करुन पाण उतारा होणे, सोशलमिडीयाच्या दुनियेत मश्गुल राहत फेसबुक, व्हॉट्सअप वापरत मोबाईलमध्ये तासन तास व्यस्त राहणे आदी कारणांनी वैतागून पतीराजांनीही पत्नीच्या तक्रारी केल्या आहेत.

19 प्रकरणे प्रलंबित वर्षभरात उस्मानाबाद, कळंब, वाशी, उमरगा या चार ठिकाणच्या सहाय्यता कक्षात 54 पुरुषांनी पत्नीच्या तक्रारी केल्या होत्या. त्यातील 35 पती-पत्नींनी सामंजस्याने एकत्र आले आहेत. तर 19 प्रकरणे प्रलंबीत आहेत. 

दोन वर्षच प्रकरण या कक्षात दोन वर्षच प्रकरण चालविले जाते़ अर्ज केलेल्या व्यक्तींचे दोन वर्षात समुपदेशन केले जाते़ त्यानंतर प्रकरण सहाय्यता कक्षातून रद्द केले जाते़ सध्या घडीला प्रलंबित राहणारी प्रकरणे ही संशायाचे व अनैतिक संबंध असणारी प्रकरणे जास्त गुंतागुतीचे असल्याचे समुपदेशकांनी सांगितले़

पीडित पत्नीही समोर येते. या कक्षातून पुरुषांच्या तक्रारी स्वीकारण्यात येतात़ पुरुषांनी पत्नींची तक्रार केल्यानंतर पडीतपुरुषांच्या पत्नीला फोन करुन किंवा पत्राद्वारे कळविले जाते़ काही प्रकरणातून महिलांच्या तक्रारीही समोर येतात़ त्या दोंघांच्या तक्रारी ऐकून समुपदेशन करुन त्या मिटविल्या जातात़ 

242 महिलांच्या तक्रारीवर्षभरात 54 पुरुषांनी पत्नीच्या कटकटीला वैतागून तक्रारी केल्या आहेत़ तर पतीचे व्यसन, हुंडा, मुलगीच का झाली यासह इतर कारणांना वैतागून पतीपिडीत महिलांनी पतीच्या तक्रारी केल्या आहेत. यातील 158 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आले आहेत, तर 85 प्रकरणे प्रलंबित आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादrelationshipरिलेशनशिप