काेविड केअर सेंटरला पाण्याचे बाॅक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:37+5:302021-05-11T04:34:37+5:30
उमरगा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार उमरगा : काेराेनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या पार्थिवावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. या कर्मचाऱ्यांचा ...

काेविड केअर सेंटरला पाण्याचे बाॅक्स
उमरगा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
उमरगा : काेराेनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या पार्थिवावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. या कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद शिक्षिका सरिता उपासे यांनी रविवारी सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक रामकृष्ण जाधवर, केंद्रप्रमुख शीला मुदगडे, पालिकेतील अधीक्षक तुळशीदास वर्हाडे, करबसप्पा शिरगुरे, सुभाष वैरागकर, आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. उपस्थितांच्या हस्ते निखिल माेरे, संताेष कांबळे, शाहुराज कांबळे, उद्धव कांबळे, सदाशिव जाधव, महादू नागराळे, सूरज बनवलकर, माेहन कांबळे, राजू देडे, गाैरव सरपे, शंकर साैंदर्गे या कामगारांचा सत्कार करण्यात आला.
लाॅकडाऊनमुळे हाॅटेल व्यावसायिक अडचणीत
भूम-काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लाॅकडाऊन केले आहे. याचा फटका अन्य व्यावसायिकांसाेबतच हाॅटेल चालकांनाही बसला आहे. लाखाे रुपयांच्या गुंतवणुकीवर पाणी फेरले गेले आहे. अनेकांनी व्यवसायासाठी बॅंकांची कर्जे घेतली आहेत. हाॅटेल बंद असल्याने कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाल्याचे सांगण्यात आले. मालकांसाेबतच कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील सर्वच हाॅटेल बंद असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी अन्य कामे करावी लागत असल्याचे काही कामगारांनी सांगितले.
अणदूर येथे रक्तदान शिबिर
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जगत्ज्याेती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त १४ मे राेजी रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबिर श्री नीलकंठेश्वर मठात हाेईल. या शिबिरामध्ये युवकांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदवावा, असे आवाहन जयंती समिती तसेच सरपंच रामचंद्र आलुरे यांनी केले आहे.
ट्रान्स्फाॅर्मर जळाला, ग्रामस्थांची गैरसाेय
जेवळी : लाेहारा तालुक्यातील वडगाव (गां.) येथील मागासवर्गीय वस्तीतील विद्युत ट्रान्स्फाॅर्मर सातत्याने जळत आहे. मागील आठवड्यात हा ट्रान्स्फाॅर्मर जळाल्याने अर्धेअधिक गाव अंधारात हाेते. एवढेच नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उद्भवला हाेता. परिणामी ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहेत. साेबतच पिकांना पाणीही देता येत नाही. जळालेला ट्रान्स्फाॅर्मर वीज कंपनीने दुरुस्त करून देणे अपेक्षित आहे. परंतु, तसे हाेत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पदरमाेड करून हा ट्रान्स्फाॅर्मर प्रत्येकवेळी दुरुस्त करावा लागत आहे. या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ईट येथे औषधे, सॅनिटायझर वाटप
ईट : भूम तालुक्यातील ईट येथील अभियंता आनंद हुंबे यांनी प्राथमिक आराेग्य केंद्राला मल्टीव्हिटॅमिन गाेळ्या, सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय आसलकर, प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश डंमरे, कर्मचारी श्रीराम आवारे, विजय जगताप, व्यापारी मनाेज हुंबे, राजराजे चव्हाण, आनंद माने, बालाजी हुंबे, आदींची उपस्थिती हाेती.