बस-दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:12+5:302021-06-16T04:44:12+5:30

उमरगा आगाराची बस (एमएच २० बीएल ०१९५) नागूरहून लोहारा, माकणीमार्गे उमरगाकडे जात होती. याच दरम्यान माकणीहून (एमएच २४ एएल ...

Both were killed on the spot in a bus-two-wheeler accident | बस-दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

बस-दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार

उमरगा आगाराची बस (एमएच २० बीएल ०१९५) नागूरहून लोहारा, माकणीमार्गे उमरगाकडे जात होती. याच दरम्यान माकणीहून (एमएच २४ एएल ८७१९) या दुचाकीवरून विकास गोरे (रा. आशिव ता. औसा), दौलत चव्हाण (रा. लोहटा, ता. औसा), दादासाहेब गडकर (रा. माकणी) हे तिघे मंगळवारी साडेचारच्या दरम्यान लोहाऱ्याकडे जात होते. याचदरम्यान माकणीजवळील निम्न तेरणा धरणाच्या पुलावर बस व दुचाकीची समोरासमोर जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील दौलत चव्हाण व विकास गोरे हे दोघे जण जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ए.एन. वाठोरे यांच्यासह एस. बी. साखरे, एल. आर. भोपळे, ए. व्ही. राठोड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Both were killed on the spot in a bus-two-wheeler accident