बोंदर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:33 IST2021-03-31T04:33:09+5:302021-03-31T04:33:09+5:30

देशी दारू जप्त भूम : तालुक्यातील अंजनसोंडा येथील दादा मोटे हे २८ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घराच्या मागे देशी ...

Bondar felicitated | बोंदर यांचा सत्कार

बोंदर यांचा सत्कार

देशी दारू जप्त

भूम : तालुक्यातील अंजनसोंडा येथील दादा मोटे हे २८ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घराच्या मागे देशी दारूच्या बाटल्यांसह येथील पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नियम मोडला

परंडा : तालुक्यातील लोणी येथील शेरखान बबन पठाण हे गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर मद्यधुंद अवस्थेत विना मास्क फिरत असताना परंडा पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. यावरून त्यांच्याविरुध्द विविध कलमान्वये परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी दारू जप्त

कळंब : तालुक्यातील मंगरूळ येथील सिध्देश्वर संभाजी गायकवाड हे मंगरूळ फाटा येथील गायरान जागेत पाच लीटर गावठी दारूसह शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

Web Title: Bondar felicitated