तेरमध्ये चाळीस दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:12+5:302021-04-17T04:32:12+5:30

तेर : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेर येथे आयोजित रक्तदान शिबिरात चाळीस दात्यांनी रक्तदान ...

Blood donation of forty donors in thirteen | तेरमध्ये चाळीस दात्यांचे रक्तदान

तेरमध्ये चाळीस दात्यांचे रक्तदान

तेर : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेर येथे आयोजित रक्तदान शिबिरात चाळीस दात्यांनी रक्तदान केले. निळा झेंडा चौकात हे शिबिर पार पडले. प्रारंभी अल्केश पोहरेगावकर, विलास रसाळ, बालाजी बनकर, बापुराव नाईकवाडी, इर्शाद मुलाणी, हरी खोटे, सुमेध वाघमारे, सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. अल्केश पोहरेगावकर, महेश तोडकरी, भीम मलकूनाईक, शिवाजी जाधव यांनी रक्त संकलन केले. या शिबिरासाठी निखील रसाळ, सिद्धोदन धावरे, योगेश वाघमारे, अंकित धावरे, आकाश सोनवणे, अभिजित सावंत, विशाल सोनवणे, शुभम वैरागे, धीरज रसाळ, किरण पेठे, ऋषिकेश कांबळे, श्रीकांत आवाड, सचिन वाघमारे, सत्यविजय सुकाळे, संतोष वाघमारे, विलास तोर, अजय वाघमारे, अनिल बगाडे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Blood donation of forty donors in thirteen