वडगावात ६२ शिवभक्तांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST2021-05-18T04:33:39+5:302021-05-18T04:33:39+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील वडगाव (सि) येथे अंकुश मोरे युवा प्रतिष्ठान व सिद्धेश्वर स्पोर्टस क्लब यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी ...

Blood donation of 62 Shiva devotees in Wadgaon | वडगावात ६२ शिवभक्तांचे रक्तदान

वडगावात ६२ शिवभक्तांचे रक्तदान

उस्मानाबाद : तालुक्यातील वडगाव (सि) येथे अंकुश मोरे युवा प्रतिष्ठान व सिद्धेश्वर स्पोर्टस क्लब यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ६२ शिवभक्तांनी सहभाग घेत रक्तदान केले.

प्रारंभी अंकुश मोरे, पं. स. सदस्य गजेंद्र जाधव, सरपंच बळीराम कांबळे, उपसरपंच जयराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुळे, लक्ष्मीकांत हजारे, सुनील पांढरे, सुरेश जानराव यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अण्णासाहेब पांढरे, विश्वजीत गुरव, प्रमोद चादरे, आण्णा मोरे, बाळासाहेब मोरे, प्रकाश मोरे, महेश मोरे, हनुमंत मोरे, राहुल म्हेत्रे, सुधीर वाडकर, योगेश ताटे, किरण जाधव आदी उपस्थित होते. शिबिरासाठी धीरज मोरे, सोमनाथ पाटील, ओमकार माळी, आश्रुबा हजारे, ओमकार मुळे, विकास गोरे, सचिन वाघमोडे, सोमनाथ कांबळे, चंद्रकांत मोरे, गणेश मंगरुळे, ज्ञानेश्वर माळी, नागेश माळी, प्रतिष्ठान व स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 62 Shiva devotees in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.