काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात ४७ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST2021-05-03T04:26:37+5:302021-05-03T04:26:37+5:30

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या ...

Blood donation of 47 people in the camp organized by Congress | काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात ४७ जणांचे रक्तदान

काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात ४७ जणांचे रक्तदान

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील

यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी प्रतिभा निकेतन विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरादरम्यान ४७ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, कंटेकूरचे सरपंच गोविंद पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव महालिंग बाबशेट्टी, संजय मिणीयार, माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, माजी उपनराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, उल्हास घुरघुरे, काशीनाथ मिरगाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराकरिता राम डोंगरे, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, राजू मुल्ला, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, गौस शेख, प्रशांत मुरुमकर, प्रणीत गायकवाड, नेताजी गायकवाड, आदींनी पुढाकार घेतला. या रक्तदात्यांचा एक वर्षाचा पाच लाख रुपयांचा अपघाती विमा यावेळी उतरविण्यात आला.

Web Title: Blood donation of 47 people in the camp organized by Congress