युवा सेनेच्या शिबिरात १०३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST2021-07-31T04:33:33+5:302021-07-31T04:33:33+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर २७ जुलैरोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित केले ...

Blood donation of 103 donors in Yuva Sena camp | युवा सेनेच्या शिबिरात १०३ दात्यांचे रक्तदान

युवा सेनेच्या शिबिरात १०३ दात्यांचे रक्तदान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर २७ जुलैरोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके यांच्याहस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, वाशी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडे, बाबा घोलप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. या शिबिरात १०३ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदानामध्ये सहभाग नाेंदविलेल्या दात्यांना युवा सेनेच्यावतीने हेल्मेट भेट देण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन तात्यासाहेब बहीर यांनी केले. यावेळी युवासेना प्रमुख बालाजी लाखे, उपप्रमुख स्वप्नील कोकाटे, माजी उप जिल्हाप्रमुख रवींद्र धर्माधिकारी, विभागप्रमुख तात्यासाहेब गायकवाड, वैद्यकीय कक्ष जिल्हा समन्वयक कानतोडे, गणप्रमुख प्रदीप कोकणे, बाबासाहेब हारे, बाबासाहेब गावडे, अमोल गायकवाड, किशोर आखाडे, दशरथ नाळपे, अभय गिराम, विलास खवले, प्रकाश मोटे, अशोक गायकवाड, बाबू घुले, मोहन सुबुगडे, महादेव मोटे, हनुमंत बहीर, गुलशाद पठाण, अभिषेक थोरात, दीपक जाधव, रणजित भैरट, प्रवीण खवले, कृष्णा खवले, प्रणव बहीर, पंडित चंदनशिव, सलीम शेख, सतीश कोठावळे आदी उपस्थित हाेते.

300721\img-20210730-wa0036.jpg~300721\img-20210730-wa0027.jpg

रक्तदान शिबिर~रक्तदान

Web Title: Blood donation of 103 donors in Yuva Sena camp